Ad will apear here
Next
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक


पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.  

‘एमसीई’ सोसायटी'चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले. सचिव लतीफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. एक ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता आझम कॅंपस येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पाच हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरून मिरवणुकीचा समारोप आझम कॅंपस येथे झाला.

महात्मा गांधी यांच्या शांती, सत्याग्रह, सलोखा, सहकार, शिक्षण, जीवन विषयक तत्वज्ञानाच्या संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. या वेळी शेख मशकूर अहमद, अब्दुल वहाब शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, प्रा. गफार शेख, प्रा. रबाब खान, प्रा. प्रवीण शेख, प्रा. आयेशा शेख, प्रा. गुलजार शेख, प्रा. मजीद सय्यद, प्रा. डॉ. किरण भिसे, प्रा. डॉ. अनिता बेलापूरकर आदी सहभागी झाले होते.

संस्थेतर्फे दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महंमद पैगंबर, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZEBT
Similar Posts
आझम कॅम्पसमध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटी येथे शुक्रवार, २१ जून २०१९ रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.
‘रंगूनवाला इन्स्टिट्यूट’मध्ये निबंध स्पर्धा पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरतर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात देविका रामधर शर्माने प्रथम, तर समियन फरीद शेख याने द्वितीय क्रमांक पटकावला.
‘मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला’ पुणे : ‘मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला, तरीही त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली आणि हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला,’ अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली
‘वेदा’तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट (वेदा) यांच्या वतीने विविध शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांनी प्रदान केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language